भुसावळ प्रतिनिधी । शहरातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सकाळी ८ वाजेपासून पैसे काढण्यासाठी खातेदार व पेन्शन धारकांची गेटसमोर गर्दी करून शासनाच्या सोशल डिस्टंन्सचा आदेशाचे उल्लंघन करून फज्जा उडविली जात आहे.
शासनाने शहरातील नागरीकांना सकाळी ७ ते १० वेळ भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी दिलेली आहे. तसेच सोशल डिस्टंन्स ठेवण्याचे आदेश जारी केलेले आहे. शहरात सकाळी प्रशासनाने ठरविलेल्या वेळेस ५ ठिकाणी भरलेल्या भाजीबाजार, किराणा दुकान, बँक या ठिकाणी जाऊन सर्व्हे केला. सोशल डिस्टंन्सच्या आदेशाची फज्जी उडवली जात आहे. शासनाच्या आदेशाचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात जमाव होत असून प्रशासन याकडे मुद्दाम दुर्लक्ष तर करीत नसावे ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
एकीकडे आमदार संजय सावकारे उपविभागीय समितीकडून रोज आढावा मागवीत आहे. मग शहरात गर्दी झालेला ठिकाणीकडे उपविभागीय समितीचे लक्ष का जात नाही आहे ? समितीमधील एकही सदस्थाना ही गर्दी दिसली नसावी का? अजूनही वेळ गेलेली नाही प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची वेळ आहे. कोरोना जळगावात पोहचवून एकाचा बळी गेला. त्याला आपल्या तालुक्यातून हद्दीपार करायचा आहे. यासाठी घरातच रहा, आपली स्वतःची काळजी घ्या. देशावर आलेल्या संकटाला एक-एक तालुक्यातून हद्दीपार करा.