भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी दिवसभरात १२ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेन- दिवस वाढ होत असल्याने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशान्वये मास्क लावणे बंधनकारक असल्याने १९ फेब्रुवारी २०२१ रोजी भुसावळ शहरातील डेली मार्केट भागात सायंकाळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक पेट्रोलिंग करीत असतांना शहरात विना मास्क फिरणाऱ्या १२ जणांविरुद्ध ५०० रुपये दंड प्रमाणे कारवाई करून एकूण ५१०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.सदरची कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, पोना.दिपक पाटील,पोकॉ ईश्वर भालेराव,जीवन कापडे, परेश बिऱ्हाडे,हेमंत जांगडे,चालक अशोक वाघ अशांची मिळून केली.