भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरात सात दिवसाचा लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतांना शहरात अनेक ठिकाणी दुकाने सुरू असल्याचे दिसून आले. भुसावळ नगर पालिका प्रशानाने आज सकाळी अनेक दुकानांवर दंडात्मक कारवाई केली असून सुरू असलेली दुकाने सील करण्यात आली आहे.
या दुकानांवर केली दंडात्मक कारवाई
प्रांताधिकारी आणि उपजिल्हाधिकारी किरण पाटील यांच्यासह नगरपालिकेच्या पथकाने १० जुलै रोजी शहरातील दिलीप पटवारी, वेफर्स कारखाना, चाहेल ढाब्यासामोर, शेख रिजावाण टायरवाले, खडका चौफुली जवळ, खांदेश फेब्रिकेशन खंडका चौफुली जवळ, मानिरुल इस्लाम लष्कर गॅरेजवाले वरणगाव रोड, अविनाश महेंद्र गोठले भाजी विक्रेता म्युनिसिपल पार्क, सागर ठाकरे भाजी विक्रेता म्युनिसिपल पार्क, प्रफुल घाडगे भाजी विक्रेता म्युनिसिपल पार्क, बंब्बू गवळी- किराणा दुकान गवळी वाडा, भारत रेडियटर जळगाव रोड, विश्वकर्मा फेब्रिकेशन जुना सातारा जळगाव रोड, यानी लॉक डाउन काळात व्यवसाय सुरू ठेवल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच भारत ट्रेडर्स पूजा कॉम्प्लेक्स हे दुकान सील करण्यात आले असून रस्त्यावर थुकणारे प्रशांत अशोक साळी रा. अमळनेर यांना दंड करण्यात आला.
यांनी केली कारवाई
पथकातील संजय बनाईते, पंकज पन्हाळे, सूरज नारखेडे, चेतन पाटील, रामदास म्हसके, विशाल पाटील, किरण मनवडे, अनिल मनवाडे, राजेश पाटील, स्वप्नील भोळे, गोपाल पाली, विजय राजपूत, योगेश वाणी, धनराज बावीस्कर मयूर भोई, दीपक शिंदे पो. कॉ. चारुदत्त पाटील पो. कॉ, किशोर पाटील यांनी कारवाई केली.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/899551420514211/