भुसावळ प्रतिनिधी । येथे रेल्वे प्रशासनाशी संबंधीत कुलींसह अन्य खासगी कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
येथे रेल्वेचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन रेल्वे टिकट चेकिंग स्टाफ ऑर्गनाइजेशन भुसावळ मंडळ यांनी रेल्वेच्या खासगी कामरांना मदतीचा हात दिला. याच्या अंतर्गत ५० हजार रु पंतप्रधान मदतनिधीसह एकुण दिड लाख रू. रेल्वेशी संबंधित कुली,स्वच्छता कामगार,विश्रामगृहात कार्यरत कामगार व काही खासगी कर्मचार्यांना संकटकाळात मदत गरजेची असल्याने त्यांना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. या मदतीच्या पहिल्या फेरीत २५० जणांना मदत करण्यात आली असून सर्वप्रथम ५० कुलींना हे किट देण्यात आले. यामध्ये ५ किलो आटा,३ किलो तांदुळ,१ किलो तुरदाळ,१किलो रिफाएंड तेल,१ किलो पोहा,१ किलो साखर,हळद,धणे व मिर्ची पावडर ,१ किलो मीठ पावडरचा समावेश आहे.
सोबतच रस्त्यावरुन ये-जा करणा-या श्रमिकांना बिस्किट आणि इतर खाद्यपदार्थ वाटप करण्यात येत आहे. या मोहीमेत सहाय्यक वाणिज्य प्रबंधक श्री. पाठक,डिसीटीआय श्री. अहलुुवालिया,वाय.डी.पाठक,ए. पी.धांडे,निसार अहमद, व्ही.के. सचान,ए.एस.राजपूत,डी.एम.कापगते, एस.व्ही.खरात यांच्यासह सर्व तिकीट तपासणीस विभागाने परिश्रम घेतले.