भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्रीमती प.क. कोटेचा महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
भुसावळ, येथील श्रीमती प क कोटेचा महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजने तर्फे आज दि. ०१ ऑगस्ट २०२२, सोमवार रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. व्ही. एस. पाटील यांनी तसेच प्रथम वर्ष कला वर्गाची विद्यार्थीनि कु. पाटील हिने प्रतिमा पूजन केले. माजी एन एस एस कार्यक्रमअधिकारी प्रा. डॉ. शुभांगी राठी यांनी दोन्ही नेत्यांच्या कार्या बद्दल माहिती सांगून उद्बोधन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. व्ही. एस. पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की थोर नेत्यांच्या जन्मस्थानना भेट देऊन विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याची तसेच त्यांच्या थोर विचारांची माहिती करून घेणे आवश्यक आहे.कार्यक्रमाचे संयोजन डॉ. जान्हवी तळेगावकर यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ . एस. के. अग्रवाल यांनी केले.सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. सौ. नीता चोरडिया यांनी आभार व्यक्त केले.