भुसावळात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संत तुकाराम महाराज युवा फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव यांच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्ताने भुसावल पंचायत समिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये ३ फेब्रुवारी 2023 रोजी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा हा संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्याचे वितरण संत तुकाराम महाराज यांचे नवे वंशज गुरुवर्य हभप अशोक महाराज मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी महाराजांनी सांगितले की पुरस्कार प्रेरणा देतात प्रेरणातून राष्ट्राची निर्मिती होते, देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता समाजाचे ऋण ऋणातच राहावे, यासाठी जी लोक प्रयत्नवादी असतात, तीच लोक समाजात भविष्याची करती नागरिक म्हणून नावाला येतात, अशाच लोकांचा विविध विभाग विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा माझ्या हातून सन्मान होत आहे, हे इतरांसाठी व माझ्यासाठी ही प्रेरणादायी ठरत आहे असे मला वाटते.

प्रमुख पाहुणे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले की, समाजातील काम करताना अद्वितीय लोकांना हिरण व त्यांचा सत्कार करणे, हे कठीणच असते. अशी नाविन्यपूर्ण काम करणारी लोक पुरस्कार घेत असतात, त्यांची कामे चांगली असल्यामुळे ती समाजात अजरामर होत असतात, अशाच समाजातील कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वामुळे आम्हाला गुन्हेगारी कमी होण्यास अत्यंत मोलाचे सहकार्य होत असते असे सांगितले.

आ.संजय सावकारे यांनी सांगितले की, समाजात जी काही रत्न असतात की, त्यामुळे समाजाच्या प्रगतीचा आलेख वाढायला अत्यंत मोलाचं सहकार्य होत असते. ती समाजप्रिय लोक म्हणजे आजची पुरस्कार प्राप्त सर्व सन्माननीय गण असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की. प्रत्येक ठिकाणी पोलीस प्रशासन तात्काळ पोहोचत नाही. वैद्यकीय मदत तात्काळ मिळवून देण्यासाठी कोणी झटत नाही, पण यांना सहकार्य करण्यासाठी काही व्यक्तिमत्त्व अत्यंत उत्साहाने मदत करीत असतात. अशी समाजातील अनसिन लोक या संस्थेने शोधून त्यांचा सन्मान केला. हे अत्यंत कौतुकास्पद असून चांगला कामाचा गौरव करणे, हे प्रेरणा व समाजास बक्षीस मिळणे, हे भाग्यच असते. यासाठी वाचन हे सुद्धा लिखाणासाठी व बोलण्यासाठी आपल्याला फार मोठे सहकार्य करते व हे इतर कार्यास ऊर्जा स्रोत असते पुरस्कार त्यांनी याच्यापेक्षा जास्त दृष्टीने काम करून समाजाचे जास्तीत जास्त भलं करण्याचा व विकासास नेण्याचे गरज असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी व्यक्त केली.

फाउंडेशनच्या ६ वर्धापन दिनानिमित्त कृषी सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, डॉक्टर साहित्यिक, आध्यात्मिक ,वारकरी, पत्रकार, यासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या २५ कार्यवीरांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला

छबिलदास पाटील यांचे कौतुक…
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे नवे वंशज हभप अशोक महाराज मोरे यांनी छबिलदास पाटील यांचे कार्य शैक्षणिक सामाजिक क्रीडा पत्रकारिता यासह विविध क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.

याप्रसंगी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे नवे वंशज अशोक महाराज मोरे, आमदार संजय सावकारे ,पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे,सहाय्यक आयुक्त उदय पाटील, उत्तर विभाग सार्वजनिक बांधकाम अभियंता यशवंत कोरके, धरणगाव तहसीलदार निलेश कुमार देवरे, पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, मराठा सेवा संघाचे प्रवक्ते रामदादा पवार, सुनील महाजन राष्ट्रीय अध्यक्ष मराठा वस्तीग्रह कक्ष, दिनेश कदम राष्ट्रीय सचिव मराठा वस्तीग्रह कक्ष, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, नगरसेवक मुकेश गुंजाळ आदर्श गाव साकेगाव येथील उपसरपंच आनंद ठाकरे, संत तुकाराम महाराज युवा फाउंडेशनचे छबिलदास पाटील, हितेश टाकले, महेंद्र पाटील, किशोर शिंदे, संजय कदम, रवींद्र लेकुरवाडे, प्रमोद महाजन, सचिन पाटील हेमंत पाटील आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जाधव यांनी केले तर आभार प्रशांतराज तायडे यांनी मानले.

Protected Content