भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील पांडुरंग टॉकीज परिसरात राहणाऱ्या ३९ वर्षीय महिलेचा किरकोळ कारणावरून वाद होऊन इतर तीन महिलांनी अंगावरील कपडे फाडून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील पांडुरंग टॉकीज परिसरात (वय-३९) महिलाही परिवारासह वास्तव्याला आहे. २७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता रावेर तालुक्यातील सावदा येथील सुनीता विशाल गौर, अनिता ज्वालासिंग ठाकूर आणि रेणुका सनी ठाकूर यांनी महिलेच्या घरी येऊन भेटले. त्यांनी महिलेला आपल्याशी काय बोलत नाही असे विचारले. याचा कोणताही प्रतिसाद न झाल्याने वाईट वाटून तिघांनी महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. महिलेला शिवीगाळ करून महिन्याच्या अंगावरील कपडे फाडले तसेच सोन्याची चैन तोडून चोरून नेली तसेच गुंड लावून तुम्हाला जीवेठार मारू अशी धमकी दिली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सुनीता विशाल गौर, अनिता ज्वालासिंग ठाकूर आणि रेणुका सनी ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील जोशी करीत आहे.