भुसावळात भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात

Bhusawal

भुसावळ प्रतिनिधी । येथील म्युनिसिपल पार्क मधील शिल्पकार पाथरवट समाज मंदिरात भगवान विश्वकर्मा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सालाबाद प्रमाणे यंदा देखील हा उत्सव समाजाचे ट्रस्ट शिल्पकार मंडळातर्फे विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून जल्लोषात साजरा करण्यात आला.

१ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या या उत्सवात दररोज काकडा आरती, भजन, कीर्तन, हरिपाठ, गीतापठण, हनुमान चालीसा पठण अशा धार्मिक कार्यक्रमांची रचना होती. सात दिवसीय कार्यक्रमात भाविकांकडून अखंडपणे २४ तास टाळ वाजवून नामस्मरण करण्‍यात आले. यंदाच्या उत्सवात पाथरवट समाजातील मुला-मुलींच्या सुप्त कलागुणांना वाव देण्याकरिता गुरुवार रोजी नृत्य स्पर्धा व विविध कलागुण प्रदर्शनाचे कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आले होते. यात मुला-मुलींनी नृत्य,गायन, वादन आदी प्रकारचे सादरीकरण केले.

सदर उत्सवाची सांगता शुक्रवार रोजी सकाळी जन्मोत्सव, महाआरती नंतर म्युनिसिपल पार्क भागात पालखी यात्रा काढण्यात आली. सदर दिंडीत भजन, सत्संग पारिवारिक पोषाखात समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्‍यानंतर नाम सप्ताहात पहारा देणाऱ्या व सहकार्य करणाऱ्या भाविकांचा सत्कार करण्यात आला. महाप्रसाद व काल्याचे किर्तन आणि उत्सवाची सांगता झाली. जयंती उत्सवाच्या यशस्वीतेसाठी शिल्पकार मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष कृष्णा पाथरवट, उपाध्यक्ष विनोद उबाळे, कार्याध्यक्ष प्रभाकर रणदिवे खजिनदार वासुदेव पाथरवट, विश्वस्त विशाल काळे, ईश्वर नागपुरे, चिटणीस संजय पिंभरे, सभासद कैलास कोळेकर, दिनेश काळे, सचिन चिलवते, महेश बिडकर, हर्षल काळे, धनंजय पाथरवट, मोहन बिडकर, योगेश उबाळे, उमेश पाथरवट, विजय नागपुरे, भाऊराव बिडकर आदी समाज बांधवांचे सहकार्य लाभले.

Protected Content