भुसावळ प्रतिनिधी । अवैध दारूच्या गुन्ह्यात फरार असलेला संशयित आरोपीस वारंवार नोटीस देवूनही हजर न राहिल्याने न्यायालयाने पकड वारंटमधील एका आरोपी अटक केले आहे. त्याच्या विरोधात भुसावळ बाजार पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गु.र.नं. 528/2016 मधील महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम कलम 65 ई मधील हिस्ट्रीसीटरवर असलेला संशयित आरोपी जावेद उर्फ काल्या आसिफ शहा रा. पापा नगर भुसावळ यांला पापा नगर झोपडपट्टी भागातून भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी अटक केली आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठो, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. चंद्रकांत बोदडे, रमण सुरळकर, महेश चौधरी, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव अशानी केली आहे.