Home Cities भुसावळ भुसावळात प्राणघातक हल्ल्यातील संशयित आरोपी अटकेत

भुसावळात प्राणघातक हल्ल्यातील संशयित आरोपी अटकेत


भुसावळ प्रतिनिधी । शिवीगाळ देण्याच्या कारणावरून तरूणांवर तलवार व तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला करून जीवेठार मारण्याच्या प्रयत्न करणारे दोन संशयित आरोपींना भुसावळ पोलीसांनी काही तासातच अटक केली असून भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी शेख अजिमोद्दीन शेख रियलोद्दीन वय-30 रा.ग्रीन पार्क भुसावळ याने संशयित आरोपी शकिर उर्फ गोलू राशीद सय्यद (वय-२३) आणि शाकीब उर्फ भांजा दाऊद शेख (वय-१९) दोन्ही रा. भुसावळ यांच्याजवळ जावून शिवीगाळ का केली याचा जाब विचारला असता राग आल्याने संशयित आरोपी शाकीर आणि शाकीब यांनी शेख अजिमोद्दीन यांच्यावर तलवार आणि चॉपरने प्राणघातक हल्ला केला. हा हल्ला २५ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शहरातील मुस्लिम कॉलनीतील पाण्याच्या टाकीजवळ घडली होती. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच काही बाजारपेठ पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन्ही संशयित आरोपींनी २६ मे रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास शहरातील पाटील मळा येथून अटक केली.

यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप परदेशी, अनिल मोरे, पोहेकॉ सुनील जोशी, अयाज सय्यद, पोना रमण सुरळकर, रवींद्र बिऱ्हाडे, तुषार पाटील, महेश चौधरी, उमाकांत पाटील, पोकॉ विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, श्रीकृष्ण देखमुख, प्रशांत परदेशी अशांनी केली आहे.


Protected Content

Play sound