भुसावळ (प्रतिनिधी) कोणत्या क्षणी काय घटना घडेल हे सांगता येत नसल्यामुळे पोलीसांना चोवीस तास अलर्ट राहावेच लागते. त्यामुळे त्यांना फार कमीच सणांचा आनंद सहकाऱ्यांसोबत एकत्र येत लुटता येतो. आज येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी आज सर्वांनी दैनंदिन कामाला बाजूला ठेवत मोठ्या उत्साहात होळी साजरी केली.
पोलीस नेहमी कुठल्यानं कुठल्या गुंतागुंतीत अडकलेलेच असतात. कधी बंदोबस्त तर कधी कायदा-सुव्यवस्था. त्यामुळे त्यांना कुठल्याही सणाचा आनंद घेता येत नाही. नागरिकांना सर्व सणांचा आनंद लुटता यावा यासाठी पोलीस नेहमी ड्युटी बजावत असतो. अगदी कुठलीही विपरीत घटना घडू नये किंवा वातावरण गंभीर होऊ नये, यांची काळजी देखील पोलिसच घेत असतात. परंतु आज कामाचा तणाव थोडा बाजूला ठेवत पोलिसांनी होळीचा आनंद लुटला. एरवी कर्मचारी आपल्या वरिष्ठांसमोर जाण्यासाठी भितात. परंतु आज कर्मचारी- अधिकारी असा कुठलाही भेद न ठेवता, एकत्रित होळीचा आनंद घेतला.