जळगाव प्रतिनिधी । आज रात्री उशीरा मिळालेल्या रिपोर्टमध्ये भुसावळात दोन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असून यामुळे शहरातील रूग्णांची संख्या १३ झालेली आहे.
सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा.
आज सायंकाळी जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये शहरातील एक रूग्ण पॉझिटीव्ह असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. ही महिला खडका रोड भागातील असल्याची माहिती समोर आली आहे. या पाठोपाठ आता शहरातील दोन रूग्ण पॉझिटीव्ह आढळले आहेत. यात सिंधी कॉलनी भागातील एका रूग्णाचा समावेश आहे. यामुळे आता शहरातील कोरोन पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या १३ झाली आहे. यातील दोन रूग्णांचा मृत्यू झाला असून उर्वरित ११ जणांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, शहरात आज आढळून आलेले तिन्ही रूग्ण हे अनुक्रमे खडका रोड (लाल बिल्डींग जवळ); सिंधी कॉलनी आणि भजे गल्लीतील आहेत. यातील सिंधी कॉलनी भागाला आधीच कंटेन्मेंट क्षेत्र जाहीर करण्यात आलेले आहे. तर पॉझिटीव्ह रूग्ण आढळल्याने आता खडका रोड व भजे गल्ली भागातही सतर्कता बाळगण्यात येणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००