भुसावळात द वर्ल्ड स्कूलमध्ये वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात

IMG 20200118 WA0066

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील कोलते फॉउंडेशन संचलित द वर्ल्ड स्कूलमध्ये नुकताच वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम हर्षोल्हासात संपन्न झाले आहे.

सदरील कार्यक्रमात अतुल्य भारत (Incredible Indian) विषयावर विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख नृत्य, नाटक, गायन आणि विद्यार्थ्यांनी विविध राज्यांचे दर्शन घडविले. जसे आसाम मधील बिहू नृत्यप्रकार, महाराष्ट्रातील कोळी नृत्य असे विविध राज्यातील विविध नृत्यांमधून भारतातील संस्कृतीचे,  परंपरेचे दर्शन विद्यार्थ्यांनी सादर केले. त्याचबरोबर मोबाईलच्या अतिवापराचे परिणाम सुद्धा मुलांनी त्यांचा नाट्यातून दाखवून दिले. लहान मुला-मुलींनी कृष्ण आणि राधा यांची वेशभूषा साकार करून नृत्य सादर केले. तसेच विविध जाती-धर्मातील लोकांनी एकत्र येऊन सर्व धर्म समभावाचा संदेश नाट्यातून देण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला आहे. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचे सर्व कलाप्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले. सदर कार्यक्रमात नर्सरी ते दहावी पर्यंतच्या  विद्यार्थ्यांनी उर्त्स्फुत सहभाग नोंदविला होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे असलेले जळगाव येथील अनुभूती स्कूलचे मुख्याध्यापक जे.पी.राव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात कोलते फॉउंडेशनचे संचालक निशिकांत कोलते, सीए पवन कोलते, सीए रोहीत कोलते, शाळेचे मुख्याध्यापक नितीन कोळी उपस्थित होते. मुख्याध्यापक कोळी यांनी वार्षिक अहवाल सादर केला आणि  विविध स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या मुलांचे कौतुक केले. स्नेह संमेलन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुश्मिता तिवारी व शाळेतील काही मुला-मुलींनी देखील मिळून केले. कार्यक्रम उत्साहात पार पडला आणि पालकांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला.

Protected Content