भुसावळ, प्रतिनिधी । हल्ली सर्वत्र कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याने संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे व गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासन वारंवार करीत आहे. मात्र, नागरपालिकेद्वारा शहरात दूषित व जंतुययुक्त पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
भुसावळच्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये नगरपालिकेच्या पाईपलाईनद्वारे नागरिकांना दूषित व जंतुयुक्त पाणीपुरवठा झाल्याने नागरिक संतप्त झाला आहे. हे दूषित व जंतुयुक्त पाणी प्याल्याने अनेकांना अतीसाराची लागण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या दूषीत व जंतुयुक्त पाण्याचा अंत्यत घाण वास येत असून पाण्यामुळे साथीचे रोग पसरुन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नगरपालिकेने तात्काळ याची दखल घेऊन शुद्ध पाणीपुरवठा करावा अशी मागणी नागरिकांनी व्यक्त केली आहे.