भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील दोन ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ आणि भुसावळ शहरपोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, भुसावळ शहरातील नगरपालिका दवाखान्यासमोर सागर हिरामण तायडे (वय-२३) रा. जामनेर हे भुसावळ नगरपालिकेच्या दवाखान्यात कंत्राटी औषधी विभागात कर्मचारी आहे. १६ एप्रिल रोजी सकाळी ९ त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १९ सीसी २९३५) ही दवाखान्याच्या आवारात पार्किंगला लावली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. याबाबत भुसावळ शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जगन सोनवणे करीत आहे.
तर दुसऱ्या घटनेतील ऋषिकेश रामचंद्र शिंदे (वय-२१) रा. विनायक कॉलनी, भुसावळ हे कामाच्या निमित्ताने शहरातील वांजोळा रोड येथील स्टार हॉटेलच्या समोर आले होते. त्यांनी दुचाकी (एमएच १९ बीपी ९७८८) पार्क करुन लावली होती. १६ एप्रिल रोजी रात्री १०.३० ते ११.३० दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र पाटील करीत आहे.