जळगाव प्रतिनिधी । आज रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये चार रूग्ण हे कोरोना पॉझिटीव्ह आले असून यातील तीन भुसावळचे तर एक जळगावचा असल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज रात्री एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांबाबतची ताजी माहिती दिली आहे. यानुसार-
जिल्ह्यात स्वॅब घेतलेल्या 12 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 8 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून चार व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये एक व्यक्ती जळगाव तर तीन व्यक्ती भुसावळच्या आहेत. यामध्ये जळगाव येथील 50 वर्षीय पुरूष, तर भुसावळ येथील तलाठी काॅलनीतील 10 वर्षीय मुलगा, जाम मोहल्ला येथील 48 वर्षीय पुरूष व अयाश काॅलनी येथील 60 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 180 इतकी झाली असून त्यापैकी पंचवीस रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तेवीस रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. कोरोना बाधितांची व्याप्ती आता वाढून आल्याचे दिसून येत आहे. आजवर प्रतापनगर भागात याचा संसर्ग आढळून आला नव्हता. आजच्या तपासणीत सकाळच्या रिपोर्टमध्ये प्रतापनगर भागातील डॉक्टरला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे या महिला डॉक्टरच्या कुटुंबियांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००