भुसावळ प्रतिनिधी । शहरातील वाईन्स दुकाने अटी शर्तीवर उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. तिसऱ्या दिवशी मद्यविक्रेत्यांच्या दुकानासमोर मद्यप्रेमींची मोठी गर्दी जमली असून लॉकडाऊन काळातील नियमांचे उल्लंघन होत आहे.
आयुक्त व जिल्ह्याधिकारी यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य परवाना धारकांना सहा मीटर सोशल डिस्टनसींग ठेवणे. पाच व्यक्तींच्यापेक्षा जास्त नको.काउंटरवर तीन व्यक्ती हवे.सर्वांनी मास्क लावणे अनिवार्य आहे.तसेच ग्राहकांना सॅनिटायझर करणे.प्रत्येक ग्राहकांना सोशल डिस्टनसींगमध्ये उभे करणे या अटी शर्तीवर आयुक्त व जिल्ह्याधिकारी यांनी परवानगी दिली आहे.
शहरातील मद्य विक्री परवाना धारकांना राज्य उत्पादन शुल्काचे दुय्यम निरीक्षक कल्याण मुळे यांनी सर्व नियम व अटीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. विनोद ब्रॅण्डिं मद्य परवाना दुकान ६ मे रोजी दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान दुसऱ्या दिवशीही उघडल्यानंतर आयुक्त व जिल्ह्याधिकारी यांच्या आदेशांचे सर्रास उल्लंघन करीत असल्याचे दिसत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाईन्स शॉप धारकांवर कारवाई करणार का ? असा सवाल सुज्ञ नागरीकांकडून केले जात आहे. दरम्यान तिसऱ्या दिवशी आज वाईन्स शॉपची दुकाने उघडली असून टोकन पद्धतीने सुरू असून नियमांची पायमल्ली केली जात आहे.