भुसावळ प्रतिनिधी । शहरासह तालुक्यातील कोरोनाने थैमान घातले आहे. तालुक्यातील आरोग्य तपासणी करण्यासाठी जि.प. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना साहित्य पुरवठा जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांच्या सहकार्याने उपलब्ध झाले आहे. यावेळी हॅण्ड ग्लोज, मास्क आणि सॅनिटायझर वाटप केले आहे.
शहरात २५ एप्रिलपासून कोरोनाने थैमान घातले आहे. तालुक्यातील वरणगाव शहरासह खडका, टहाकळी, तळवेल, कंडारी, दिपनगर, आदी परिसरातही शिरकाव केला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कंटेनमेंट झोन परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी जि.प. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता पांढरे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांना संरक्षण म्हणून जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांनी ५०० हॅन्ड ग्लोज, १००० फेस मास्क आणि सॅनिटायझ साहित्याचा पुरवठा केला आहे. शुक्रवार रोजी बद्री प्लॉट येथील नगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये हे साहित्य देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जि.प. आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ.प्रमोद पांढरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता पांढरे, डॉ.रुपाली सावकारे, नगरसेवक निर्मल कोठारी उपस्थित होते. संपूर्ण तालुक्यांमध्ये ही आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.