जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवदत्त नगरात बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील रोख रकमेसह चांदीचे दागिने असा एकुण ४१ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. भुसावळ बाजारपेठ पोलीसात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, मिनाक्षी संतोष गोळे (वय-३९) रा. शिवदत्त नगर, आंबेडकर सभागृहाजवळ येथे राहतात. खासगी नोकरी असल्यामुळे कामाच्या निमित्ताने ३ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ८ वाजता घराला कुलूप लावून घराबाहेर पडल्या. ९ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्या घरी परतल्या. घरी असल्यावर घरात चोरी झाल्याचे दिसून आले. घरातील कपाटात ठेवलेले ३० हजार रूपयांची रोकड, पेनड्राईव्ह, नवीन घड्याळ, चांदीचे पैंजण, चांदीचे जोडवे असा एकुण ४१ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नेव्हील बाटले करीत आहे.