भुसावळ, दत्तात्रय गुरव– शहरातील सुरक्षा विभागामार्फत आपत्ती व्यवस्थापन दल यांच्यासह कार्यरत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वतीने आपत्कालीन परिस्थितीत अपघातग्रस्तांची सुटका करण्यासाठी मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले.
ऐनवेळी एखादी दुर्दैवी घटना घडली तर वेळ प्रसंगी काय करावे व प्रवाशांना वेळेवर औषधोपचार करुन त्यांचे प्राण कसे वाचवावे याकरिता कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष करून दाखवलेले प्रात्यक्षिक करण्यात आलं.आपत्ती व्यवस्थापन बल पुणे विभागामार्फत मॉकड्रिल करण्यात आलं.
रेल्वे अपघात झाला तर प्रवाशांचे प्राण कसे वाचवावे ? अपघातात गंभीर जखमी झालेले , किरकोळ जखमी झालेले आहेत त्यांना वैद्यकीय उपचारासाठी कसे पाठवावे ? याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
यावेळी एनडीआरएफ, सेंट जॉर्ज अम्ब्युलन्स, सिव्हिल अम्ब्युलन्स यांचे पथक तसेच रेल्वे हॉस्पिटल मेडिकल स्टाँप, अपघात निवारण रेल्वे व विभागीय अधिकारी यांचेसह सहाय्य कर्मचारी उपस्थितीत होते. एनडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन दलाने आपत्कालीन परिस्थितीत अपघातग्रस्तांची सुटका आणि त्यांचे वैद्यकीय सहाय्यता कशी करावी याबाबतचे प्रात्यक्षिक यशस्वीरित्या करून दाखविले