भुसावळ, प्रतिनिधी । जिल्ह्यधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या आदेशानुसार भुसावळ नॅशनल हायवे क्र. सहावरून भुसावळ आगाराची सातवी बस परप्रांतीयांना घेऊन रवाना झाली आहे.
लॉक डाऊनमुळे अडकून पडलेल्या परप्रांतीयांना भुसावळ आगार येथून सहा बस सोडण्यात आल्या आहेत. आज सातवी बस रवाना झाली. याप्रसंगी भुसावळ प्रांत अधिकारी रामसिंग व तहसीलदार दिपक धिवरे यांची उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बसला संपूर्ण सॅनिटायझर करून पायी चालत जाणाऱ्या २२ परप्रांतीय प्रवाशांना सोशल डिस्टनसींग ठेवून एका सीट वर एक प्रवाशी असे बसवून बस भुसावळ वरून मध्यप्रदेश बॉर्डर चोरवड नाका रवाना झाली.