भुसावळ प्रतिनिधी । कोरोना विषाणूने जगात थैमान घातले आहे. देशातही त्याचा फैलाव अधिक प्रमाणावर आहे. आपत्तीच्या काळात कोरोनाबाधितांसाठी आर्थिक मदत व्हावी यासाठी भुसावळातील सब्जी मंडी गृप आणि आडत असोसिएशनच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ हजाराची मदत केली.
याबाबत माहिती अशी की, जगासह राज्यात कोरोना आपत्तीचा कहर झाला आहे. आपत्तीला नष्ट करण्यासाठी सरकार सर्वोतपरि उपाययोजना करत आहे. या संकट समयी राज्यसरकाने मुख्यमंत्री सहाय्यता निधिस आर्थिक सहाय्य करण्यासाठी आवाहन केले होते. या आवाहनाला भुसावळ येथील सब्जी मंडी गृप आणि अडत असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांनि प्रतिसाद देत व आपले कर्तव्य म्हणून २५ हजारांचा डिमांड ड्रॉप प्रातांधिकारी सुलाने यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र चौधरी, सचिव निलेश माळि , उपाध्यक्ष उमेश चौधरी तर व्यापारीवर्गाचे दीपक काटकर, अनिल चौधरी, गोलु चौधरी उपस्थित होते.