भुसावळ प्रतिनिधी । प्राणघातक हल्लाप्रकरणी नगरसेवक तथा शिक्षण सभापती मुकेश पाटील यांचे विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, नगरसेवक तथा शिक्षण सभापती मुकेश पाटील यांचे विरुध्द शहर पोलिस ठाण्यात प्राणघाताक व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये २० फेब्रुवारी २०२० रोजी दाखल करण्यात आला होता. मुकेश नरेंद्र पाटील यांनी भुसावळ येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी होऊन १८ मार्च २०२० रोजी अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी.डोरले यांनी मुकेश नरेंद्र पाटील यांचा अटकपूर्व जामीन मंजुर केल्याचे आदेश करुन,अटक केल्यास त्यांना रक्कम रु. 25 हजार रूपयाचे जात मुचलक्यावर सोडण्याचे आदेश केले. सरकारतर्फे सरकारी वकिल ॲड. भोंबे यांनी काम पाहिले तर आरोपीतर्फे अॅड. राजेंद्र राय यांनी काम पाहिले.