भुसावळातील दहावीची बैठक व्यवस्था जाहीर

भुसावळ प्रतिनिधी । ३ मार्चपासून सुरू होणार्‍या दहावीच्या परिक्षेसाठी भुसावळातील बैठक व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.

शहरातील विविध शाळांमध्ये दहावीच्या परिक्षेचे केंद्र असून यात सेंट अलॉयसिस हायस्कूल, डी.एस. हायस्कूल, संत गाडगे महाराज हिंदी विद्यालय, डी. एल. हायस्कूल, म्युनिसिपल हायस्कूल, बीझेड उर्दू हायस्कूल, बियाणी स्कूल येथे केंद्र असतील. यात म्युनिसिपल हायस्कूल येथे मुख्य केंद्र आहे. या केंद्रावर नियमीत व पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी परिक्षा देणार आहे. तसेच विद्यार्थी यांचे विषयानुसार बैठक व्यवस्था व वेळापत्रक हायस्कूल व उपकेद्रावर लावण्यात आले आहे. मराठी, हिंदी, व स्ंस्कृत, इंग्रजी, विज्ञान, इतिहास नागरिकशास्त्र, पेपर एक व भूगोल, अर्थशास्त्र पेपर दोन, बीजगणित पेपर एक व भूमिती पेपर दोनची बैठक व्यवस्था राहील. श्री गाडगेबाबा हायस्कूल येथे बैठक क्रमांक डी १७१५८७ ते डी १७१७३६ असे १५० विद्यार्थ्यांची सहा ब्लॅकमध्ये बैठक व्यवस्था केली आहे. मुख्य केंद्र असलेल्या म्युनिसिपल हायस्कूल येथे डी १७१७३७ ते डी १७२०६१ पर्यत ३२५ परीक्षार्थींची १३ ब्लॅकमध्ये बैठक व्यवस्था केली आहे. उपकेंद्र असलेल्या अहिल्या देवी कन्या विद्यालयात १७२०६२ ते डी १७२२११ पर्यत १५० परीक्षार्थींची आठ ब्लॉॅकमध्ये बैठक व्यवस्था केली आहे. सर्व पुनर्परीक्षार्थी (रिपीटर) विद्यार्थी बैठक व्यवस्था डी १७२२१४ ते डी १७२२४० असे २२ परीक्षार्थींची एका ब्लॉकला व्यवस्था केली आहे. संस्कृत विषयाचा पेपर म्युनिसिपल हायस्कूलमध्ये होणार असल्याचे केंद्र संचालक बी.एस.सोनवणे यांनी कळवले आहे.
संत गाडगे महाराज हिंदी कनिष्ठ महाविद्यालय : शहरातील संत गाडगे महाराज हिंदी कनिष्ठ महाविद्यालयात दहावीच्या परिक्षेची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. यात मराठी विषयासाठी डी १७२७२९ ते डी १७२९०६, हिंदी विषयासाठी डी १७२९०७ ते डी १७२९९१, उर्दू विषयासाठी डी १७२९९२ ते डी १७३०१३ तसेच रिपीटर मराठी विषयासाठी डी १७३०१४ ते डी १७३०६४, रिपीटर हिंदीसाठी डी १७३०२३ ते डी १७३०६३ अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

Protected Content