भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरात दिवसेंदिवस कोरोना रूग्णाचे प्रमाण वाढत आहे. शहरात २५ ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र आहेत. कोरोनाच्या पाश्वभूमीवर पोलीस प्रशासन व्यस्त असतांना गुन्हेगारी वाढत आहे. गुन्हेगारी कमी करण्यास पोलीस प्रशासन कटिबध्द असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन बाजारपेठचे पोलीस निरिक्षक दिलीप भागवत यांनी केले आहे.
भुसावळ शहरात गेल्या आठ दिवसांत पोलीस अधिकारी व डि.बी.पथकाला तीन गावठी पिस्टल गोळ्यासह तसेच एका घरातुन एक धारदार तलवार मिळाले आहे. या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येईल. गुन्हेगारांवर कडक कार्यवाही करून शहरातील गुन्हेगारी समुळ नष्ट केली जाईल नागरीकांनी घाबरून जाऊ नये, असा विश्वास बाजारपेठचे पो.नि.दिलीप भागवत यांनी व्यक्त केला आहे.
https://www.facebook.com/watch/?v=661648911089768