भुसावळ, प्रतिनिधी । शहरातील काझी प्लॉट भागातील ७५ वर्षीय वृध्द महिला कारोनाबाधित असल्याचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला होता. त्या महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. भुसावळात कोरोनाबाधित मृतांचा आकडा आता पाचवर पोहचला आहे.
महिलेच्या संपर्कातील १० जणांना क्वारंटाईन
शहरातील काझी प्लॉट भागातील ७५ वर्षीय वृद्ध महिलेस कोरोनाची लागण झाली होती. या महिलेचा अहवाल मिळताच, वैद्यकीय पथकाने त्यांच्या संपर्कातील १० जणांना तपासणी करून क्वारंटाइन केले आहे. आज लागलीच दुसऱ्या दिवशी ही महिला उपचारादरम्यान मृत पावल्याची बातमी समोर आली आहे. शहरात एकूण २१ रुग्ण आढळून आले असून, त्यातील ५ रुग्ण आता मृत झाले आहेत. तर १६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या भुसावळ शहर कोरोनाबाबत हॉटस्पॉट ठरले आहे.
उद्यापासून पुन्हा आठवडाभर संचारबंदी
दरम्यान, जिल्ह्यातील जळगाव, पाचोरा, भुसावळ, अमळनेर व चोपडा या शहरातील जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता इतर व्यवहार उद्या १० मे पासून लॉकडाऊन संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज काढले आहेत.