भुसावळ प्रतिनिधी । देशात सुरु असलेल्या कोरोना आजाराशी लढा व लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी मध्य व कोकण रेल्वेतील रेल्वे कामगारांच्या सर्वात मोठ्या एनआरएमयु अर्थात नॅशनल रेल्वे मजदुर संघटनेतर्फे पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी ५१ लाख प्रमाणे एकुण १ कोटी २ लाख मदतीचे धनादेश देण्यात आले.
देशावर असोकी कामगारांवर आलेल्या कुठल्याही संकटात नेहमी एनआरएमयु संघटनेचा पुढाकार असतो त्यामुळे मध्य व कोकण रेल्वेचे महामंत्री वेणु पी.नायर यांनी युनियन सदस्यता शुल्कातून गोळा झालेल्या रकमेतुन हा निधी देण्यात आला. नॅशनल रेल्वे मजदुर युनियन या संघटनेने पुर्वी गुजरात भूकंप ५० लाख, केरळ पुरग्रस्तांसाठी १ कोटी, सांगली सातारा पुरग्रस्तांना १ कोटी रु.निधी दिल्याचेही महामंत्री वेणु पी.नायर यांनी सांगितले. यूनियनचे कार्यक्षेत्र मुंबई ते खंडवा, मुंबई ते बडनेरा,मुंबई ते मडगांव कोकण पर्यंत असल्याची माहिती भुसावळ विभागीय सचिव आर.आर.निकम यांनी दिली.