Home Cities भुसावळ भुसावळच्या यार्डात रेल्वे इंजिन घसरले

भुसावळच्या यार्डात रेल्वे इंजिन घसरले

0
108

derail

भुसावळ प्रतिनिधी । येथील रेल्वे यार्डात आज इंजिन घसरल्याने खळबळ उडाली. मात्र यात कोणतीही हानी झाली नाही.

याबाबत वृत्त असे की, रेल्वे यार्डातील सीवायएम ऑफिसजवळ दुपारी एका मालगाडीचे रेल्वे इंजिन घसरले. यावेळी मोठा आवाज झाल्याने परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, या दुर्घटनेत इंजिन अथवा कोणतीही बोगी उलटली नाही. यामुळे यात फारशी हानी झाली नाही. अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या मदतीने इंजिन पुन्हा रेल्वे रूळांवर ठेवले. दरम्यान, ही घटना नेमकी कशामुळे घडली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.


Protected Content

Play sound