Home Cities भुसावळ भुसावळच्या महाराणा प्रताप विद्यालयाची शैक्षणिक सहल रवाना (व्हिडीओ)

भुसावळच्या महाराणा प्रताप विद्यालयाची शैक्षणिक सहल रवाना (व्हिडीओ)


bhusaval trip

भुसावळ, प्रतिनिधी | येथील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित महाराणा प्रताप विद्यालयाची शैक्षणिक सहल आज (दि.१८) येथून अजमेर-पुरी एक्सप्रेसने जगन्नाथपुरीकडे रवाना झाली आहे. ही सहल दि.२४ रोजी रात्री १२.०० पर्यंत परतणार आहे.

 

ही सहल रविवारी (दि.१९) संध्याकाळी ६.२० वाजता जगन्नाथपुरी येथे पोहचणार असून सोमवार ते गुरुवार (दि.२० ते २३) दरम्यान कोणार्कचे सूर्यमंदिर, जगन्नाथपूरी येथील जगन्नाथ मंदिर व भुवनेश्वर येथील प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन. दि.२३ रोजी रात्री १०.४५ वाजता पुरी-अजमेर एक्सप्रेसने सहलीचा परतीचा प्रवास होणार असून दि.२४ शुक्रवार रोजी रात्री ११.४५ वाजेपर्यंत ती भुसावळात पोहोचणार आहे. तरी पालकांनी वेळेवर विद्यार्थ्यांना घेण्यास स्टेशनवर उपस्थित रहावे, असे आवाहन विद्यालयाने केले आहे.

 

 


Protected Content

Play sound