भुसावळच्या ‘त्या’ रूग्णाला कोरोना नव्हे तर रेबीज !

जळगाव प्रतिनिधी । भुसावळ येथील एकाला कोरोनाच्या संशयातून जिल्हा रूग्णालयात दाखल केले असून त्याला कोरोनाचा संसर्ग नव्हे तर रेबीज झाल्याची माहिती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, गुरूवारी जिल्हा रूग्णालयात कोरोनाचे चार संशयित रूग्ण दाखल करण्यात आले होते. यात भुसावळ येथील एका डॉक्टरचा समावेश होता. या डॉक्टरला बेशुध्दावस्थेत दाखल करण्यात आले होते. कालच त्यांचे सँपल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तथापि, त्यांना कोरोनाचा संसर्ग नव्हे तर रेबीज झाल्याचे आज निष्पन्न झाले आहे. यामुळे त्यांना मुंबई येथे पाठविण्यात आले असून त्यांच्यावर रेबीजचे उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता बी. एन. खैरे यांनी दिली.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content