जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव-शिरसोली रस्त्यावरील एलएच पेट्रोल पंपासमोर जळगावकडे निघालेल्या दुचाकी स्वराला मागून मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दीड वर्षाच्या मुलाचा जागेचा मृत्यू झाला तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. घटना रविवारी ११ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सुमारास घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक व मित्र परिवाराने जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात एकच गर्दी केली होती.
शेख अली शेख शरीफ वय वर्ष दीड रा. फातिमानगर जळगाव असे मृत झालेल्या बालकाचे नाव आहे तर शेख अमिन शेख आरिफ हे जखमी झाले आहे.
अधिक माहिती अशी की, शेख अमीन शेख आरिफ यांना पंधरा दिवसांपूर्वीच मुलगी झाली होती. त्यामुळे मुलीला पाहण्यासाठी रविवारी ११ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सासरवाडी शिरसोली येथे त्यांचा भावाचा मुलगा शेख अली शेख शरीफ याला सोबत घेऊन गेले. मुलीला बघितल्यानंतर पुन्हा दुचाकीने जळगावकडे येत असताना सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जळगाव शिरसोली रस्त्यावरील एल एस पेट्रोल पंपाजवळून जात असताना मागून भारधाव वेगाने येणाऱ्या मालवाहू छोटा हत्ती क्रमांक (एमएच १९ सीवाय ३२९०) या वाहनाने जोरदार धडक दिले या धडकेत दुचाकी वरील दीड वर्षाचा चिमुकला शेख अली हा रोडवर पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली, यात त्याचा जागीच मृत्यू झाला तर शेख अमीन हे गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बालकाचा मृत्यू जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रावांना करण्यात आला यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची प्रचंड गर्दी केली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.