भीम आर्मी खानदेश प्रांत प्रचार प्रसिद्धी प्रमुखपदी सुपडू संदानशिव यांची निवड

यावल, प्रतिनिधी | भीम आर्मी (संरद)च्या राज्य सचिव व खानदेश प्रांताचे प्रचार-प्रसिद्धी प्रमुख पदी विद्रोही कवी सुपडू संदानशिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

 

सुपडू संदानशिव यांनी आर्मी भारत एकता मिशन ह्या संघटनेची जळगाव जिल्ह्यातील पहिली छावणी स्थापन केली होती. ते विद्रोही कवी म्हणून देखील प्रसिद्ध आहेत. त्यांनी जळगाव जिल्ह्यात भीम आर्मी घराघरात पोहचविण्याचे मोलाचे कार्य केले आहे. ते समाजातील विषमता आपल्या साहित्यातून उत्तमरित्या मांडतात. त्यांच्या कार्याची भीम आर्मी (संरद) संस्थापक प्रमुख प्रफुल्ल शेंडे यांनी दखल घेत  राज्य सचिव व उत्तर महाराष्ट्र अर्थात खानदेश प्रांताचे प्रचार-प्रसिद्धी प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्यप्रमुख रमाकांत तायडे यांच्या सुचनेनुसार राज्य महासचिव रामकृष्ण नेरकर यांनी ही नियुक्ती जाहीर केली आहे. त्यांचे नियुक्ती पत्र ई मेल द्वारे पाठवण्यात आले आहे.

Protected Content