जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेशातील देवबंद भागात हल्लेखोरांनी कारमधून गोळीबार केला. यात आझाद हे थोडक्यात बचावले आहे. प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर अटक करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीम आर्मी संघटनेच्या वतीने निषेध व्यक्ती करत जोरदार घोषणबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील देवबंद भागात आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर २८ जून रोजी काही अज्ञातांकडून प्राणघातक हल्ला झाला. हरियाणाची नंबर प्लेट असलेल्या चारचाकीमधून आलेल्या हल्लेखोरांनी चंद्रशेखर यांच्यावर ४ राऊंड फायर केले. झाद यांच्या कमरेजवळून एक गोळी चाटून गेली. चारचाकीच्या काचाही फुटल्या आहेत. गोळीबारानंतर चंद्रशेखर आझाद यांना उपचारासाठी तातडीने नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते थोडक्यात बचावले आहे. दरम्यान, हल्लेखोरांना तातडीने अटक करण्यात यावी, आझाद यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी भीम आर्मी जळगाव शाखेचे जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी ३० जून रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.