कोल्हापूर । भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयएकडे सुपुर्द करण्याच्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निर्णयावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भीमा-कोरेगावचा तपास राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएकडे देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमिवर, कोल्हापुरा आज शरद पवार म्हणाले की, भीमा-कोरेगाव प्रकरणी निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. परंतु, भीमा कोरेगावबाबत इथल्या राज्याच्या गृहखात्याच्या अधिकार्यांची वागणूक अक्षेपार्ह आहे, अशी तक्रार आमच्याकडं अनेकांनी विशेषत: जैन समाजाच्या लोकांनी केली आहे. ज्यांची वागणूक आक्षेपार्ह आहे, याबाबत चौकशी झाली पाहिजे. याबद्दल चौकशीचा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू होताच केंद्रानं हा तपास राज्याकडून काढून घेतला होता. घटनेनुसार कायदा व सुव्यवस्था हा राज्याचा अधिकार आहे. असं असताना आपला अधिकार त्यांनी काढून घेणं योग्य नाही. तो अधिकार कुणी काढत असेल तर त्यास पाठिंबा देणं योग्य नाही, असे शरद पवार म्हणाले.