यावल प्रतिनिधी । महात्मा फुले नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तालुक्यातील भिलवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.
आज १८ फेब्रुवारी २०२० रेाजी जूना सातारा, मरिमाता मंदिर भिलवाडी येथे महात्मा फुले नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबीराचे उद्घाटन शिक्षण सभापती मुकेश पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी हदयरोगतज्ञ डॉ. संदीप भारूडे, बालरोगतज्ञ डॉ. सुयोग तन्नीवार आणि स्त्रीरोगतज्ञ डॉ. रूबीना आसिफ शेख यांनी रूग्णांची तपासणी केली. यावेळी या शिबीरात रूग्णांचा चांगला प्रतिसाद मिळाला. वैद्यकिय अधिकारी डॉ. अतिया खान यांनी या शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.