जळगाव, प्रतिनिधी | निव्वळ समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेतून समाजाने वाळीत टाकलेल्या भिकाऱ्यांना आपलेसे करून त्यांच्यावर मोफत उपचार करणाऱ्या आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी झटणाऱ्या डॉक्टर सोनवणे दाम्पत्याला उद्या जळगावात केशव स्मृती प्रतिष्ठानतर्फे ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ देवून गौरव करण्यात येणार आहे. भिकारी या समाजातील वंचित घटकासाठी आयुष्य वाहून घेणाऱ्या या दाम्पत्याला त्यांच्या सेवा कार्यात कोणते कडू-गोड अनुभव आले, ते आपण त्यांच्याचकडून खास ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’च्या प्रेक्षकांसाठी त्यांच्याच शब्दात जाणून घेवूया. त्यांच्याशी बातचीत करीत आहेत, वृत्तसंपादक विवेक उपासनी.