जळगाव प्रतिनिधी । शहरातील भिकमचंद जैन नगरात राहणाऱ्या ४८ वर्षीय प्रौढाचा अपार्टमेंटच्या छतावरून पडून मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे ४ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विजय प्रल्हाद शिनकर (वय ४८, रा. भिकमचंद जैन नगर) असे मयताचे नाव आहे. शनिकर हे वैद्यकीय प्रतिनिधी (एमआर) म्हणून काम करीत होते. मुळचे वरणगाव येथील शिनकर कुटुंबिय गेल्या दोन वर्षांपासून भिकमचंद जैन नगरात राहण्यासाठी आले आहेत. या ठीकाणी सिद्धांत अपार्टमेंटमध्ये चवथ्या मजल्यावर त्यांनी स्वत:चे घर घेतले आहे. घरात पत्नी कल्पना, मुलगी श्रध्दा आणि मुलगा सारंग अश्यांसोबत राहतात. शिनकर कुटुंबियांनी रात्री १२ पर्यंत गप्पा मारल्या व झोपले. पहाटे चार वाजता मुलगा सारंग झोपेतून उठल्यावर वडील जागेवर दिसून आले नाही. त्यांनी शोधाशोध केली असता मिळाले नाही. शेवटी अपार्टमेटच्या छतावर जावून पाहणी केली व खाली डोकावून पाहिले असता विजय शिनकर यांचा अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून खाडी पडल्याने मृत्यू झाला होता. हे पाहून कुटुंबियांन प्रचंड धक्का बसला. अपार्टमेंटमधील लोकांच्या मदतीने शिनकर यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले. शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.