कासारगोड (वृत्तसंस्था) एका भावानेच आपल्या बहिणीला विष असलेले आइसक्रिम दिले. परंतू तिच्या वडीलांनीही हे विष असलेले आइसक्रिम खाल्ल्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची घटना केरळमधील कासारगोडा जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी २२ वर्षीय अलबीन नामक आरोपीला अटक करण्यात आली आहे.
अलबीनने आइसक्रिममध्ये विष केवळ बहिणीला मारण्यासाठी टाकले होते. मात्र १६ वर्षीय मृत अॅनासोबतच तिच्या वडीलांनीही हे विष असलेले आइसक्रिम खाल्ले. त्यामुळे काही वेळाने दोघांची प्रकृती बिघडली. त्यांना लगेचच कुन्नूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की ही घटना ३ ऑगस्ट रोजी घडली. मात्र अॅनाच्या शरीरात जास्त विष गेल्यामुळे ६ ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला. दरम्यान, अलबीनने याआधीही जेवणात विष टाकले होते, त्यानंतर त्याने आइसक्रिममध्ये विष टाकून बहिणीची हत्या करण्याचा कट रचला.