जळगाव प्रतिनिधी । भावाच्या पत्नीवर अत्याचार केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दीराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील मेहरूण शिवारात सासु सासऱ्यांनी कौटुंबिक वादातून विवाहितेला पतीसह घराबाहेर काढले होते. शहरातील एका भागात पती-पत्नी आपल्या सहा महिन्याच्या मुलीसह राहतात. नात्याने लहान दिर असलेल्या संशयित आरोपी शकील पिरजादे याने घरात कुणीही नसतांना ६ मार्च २०२० रोजी विवाहिता एकटी असतांना पाहून बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर विवाहिता रडत असल्याचे पाहून शकीलने ५०० रूपये देवून कोणाला सांगू नको अशी धमकी दिली. दरम्यान समाजात आपली बदनामी होईल म्हणून विवाहिता जळगाव सोडून औरंगाबाद येथील कांसबरी दर्गा येथे राहण्यासाठी आली. तेव्हापासून ती तणावात होती. दरम्यान, छावणी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शकील पिरजादे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गुन्हा झिरो नंबरने एमआयडीसी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.