जळगाव, प्रतिनिधी । भारत विकास परिषद, शाखा जळगावतर्फे १० जुलै रोजी स्थापना दिवसानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात येत असते. परंतु, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊन असल्याने रक्तदान शिबीराचे आयोजन २८ जुलै रोजी करण्यात आले.
माधवराव गोळवलकर रक्तपेढीच्या सहकार्याने भारत विकास परिषद, शाखा जळगाव ह्यांनी भाऊंचे उद्यान येथे रक्तदान शिबीर आयोजित केले होते . शिबिरात संस्थेच्या सभासदांसोबत इतर नागरिकांनी रक्तदान केले. या शिबिरात २८ युनिट रक्त संकलन करण्यात आले. सर्व रक्तदात्यांकरिता भारत विकास परिषद सदस्य असलेल्या डॉक्टरांनी मोफत दंतचिकित्सा ,होमियोपॅथी निदान आणि आयुर्वेदिक चिकित्सा निदान प्रोत्साहनपर देण्याचे निश्चित केले गेले. प्रकल्प प्रमुख डॉ. विनीत नाईक ह्यांच्या मार्गदर्शनात उमेश पाटील, गिरीश शिंदे , डॉ. अग्रवाल , चेतन दहाड ,प्रसन्न मांडे, विशाल चोरडिया ह्यांनी सफलतेसाठी प्रयत्न केलेत. तर याप्रसंगी शाखा अध्यक्ष उज्वल चौधरी , सचिव योगेश पाटील, प्रांत अध्यक्ष तुषार तोतला, वरिष्ठ सदस्य रवींद्र लद्धा, रत्नाकर गोरे आदी सदस्य उपस्थित होते.