जळगाव प्रतिनिधी । शहरातील बालगंधर्व नाट्यगृहात सुरू असणार्या आशा महोत्सवात चारचाकीतून आपल्या मुलासह भारत परिक्रमा करणार्या पाटील दाम्पत्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
बालगंधर्व खुल्या नाट्यगृहात सुरू झालेल्या आशा महोत्सवात पाटील दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. आपल्या चारचाकीतून भारत परिक्रमा करणार्या किशोर पाटील, संध्या पाटील व त्यांचा पुत्र वास्तव यांच्या धाडसाला आधीच जळगावकरांनी सलाम केला आहे. आज आशा महोत्सवात त्यांच्या कार्याचा पुन्हा एकदा गौरव करण्यात आला.या प्रसंगी अनुभूती शाळेच्या संचालिका निशाभाभी जैन यांच्यासह सकाळचे निवासी संपादक राहुल रनाळकर, रेमंड कंपनीचे कार्यकारी संचालक अनिल नारखेडे, राज्य नाट्य स्पर्धेतील कलावंत शुभम सपकाळे, क्रिएटिव्ह ग्रुपचे प्रमोद माळी, तसेच प्रकल्प संचालक गिरीश कुळकर्णी उपस्थित होते.