अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय संस्कृतीत आदिवासी संस्कृती सर्वात सौंदर्यशील असल्याची भावना आ.अनिल भाईदास पाटील यांनी जवखेडा येथे सामाजिक सभागृहाच्या लोकार्पण प्रसंगी व्यक्त केली.
जागतिक आदिवासी दिनाचे अवचित्य साधून स्थानिक आमदार विकास निधीतुन मौजे सावखेडा येथे भिल्ल वस्तीत 10 लक्ष निधीतून निर्माण झालेल्या सामाजिक सभागृहाचे लोकार्पण आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ग्रामस्थांनी आमदारांचे जल्लोषात स्वागत करून सत्कार केला, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, कार्याध्यक्ष सुरेश पाटील, पंचायत समिती सदस्य प्रविण पाटील, सरपंच हेमलता कदम, उपसरपंच लखन कदम, भुपेश सोनवणे, कपिल पाटील, निंबाजी कदम, विजू सर, शाम कदम, संजय भिल, दिपक भिल, विश्वास नाईक, तुळशीराम भिल, आबा नेरकर, विजय महाले तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार पाटील म्हणाले की आदिवासी संस्कृती ही भारतीय संस्कृतीतील सर्वात सौंदर्यशील जीवनपद्धती आहे. मूर्तिपूजक संस्कृतीपेक्षा निसर्गपूजक जीवनाशी असलेला त्यांचा संबंध हा विज्ञानवादी दृष्टिकोन आणि सोबतचं जल, जंगल, जमिनी सोबतची त्यांची बांधिलकी ही देशाला सदैव तारणारी असेल असे सांगून जागतिक आदिवासी दिनाच्या सर्वाना शुभेच्छा दिल्यात..!