जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मूळ जळगाव येथील व सध्या अमेरिकेतील न्युयॉर्क येथे स्थायीक असलेले व औषध निर्माण शास्त्रातील संशोधक डॉ. केतन शिरीष पाटील यांच्या नावे आतापर्यंत तीन पेटंट मिळाली आहेत.
डॉ. केतन पाटील यांना Biomarkers for Parkinson’s disease या आजारावरील त्यांनी शोधलेल्या औषधाचे तीन पेटंट मिळाली आहेत. अमेरीकेने त्यांना अगोदरच त्यांनी शोधलल्या या औषधाचे पेटंट दिले होते. यानंतर आता युरोपीय राष्ट्र आणि जापाननेही त्यांना पेटंट दिले आहे. डॉ. केतन पाटील येथील लक्ष्मी मेडिकल्स्चे संचालक शिरीष पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव आहेत. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.