जळगाव प्रतिनिधी । भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेची जिल्हा कार्यकारिणी घोषीत करण्यात आली. संघटेनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अनिल बाविस्कर तर सचिवपदी दिव्या पाटील यांची निवड करण्यात आली.
जिल्ह्यातील उर्वरित कार्यकारिणी याप्रमाणे
जिल्हा उपाध्यक्षपदी अनिल शिवाजी बाविस्कर (चोपडा), जिल्हा मुख्य सचिव दिव्या यशवंत पाटील (भडगाव), सचिव प्रतिक्षा मनोज पाटील (जळगाव), आकाश अशोक धनगर (चोपडा), सागर रतीलाल महाजन (जळगाव),आकाश गोरख पाटील (जळगाव), ट्रेझरर- शुभम नंदकिशोर पाटील (जळगाव), जिल्हा सदस्य धनश्री विवेक ठाकरे (रावेर), कोमल अविनाश पाटील (चाळीसगाव), मानसी शशिकांत धोंडगे (एरंडोल), गायत्री नरेंद्र धांडे (यावल), प्राजक्ता जयदीप राणे (फैजपूर), किरण एकनाथ तायडे (धरणगाव), समीर जमील देशपांडे (जळगाव), वेदांत विजयानंद कुलकर्णी (जामनेर), आकाश प्रकाश पाटील (पाचोरा), इरफान उस्मान पिंजारी(जळगाव), विपुल पुरुषोत्तम पाटील (जळगाव), सारांश धनंजय सोनार (अमळनेर), कुणाल जगन्नाथ कोल्हे (रावेर), योगेश चौधरी (रावेर) यांची निवड करण्यात आले आहे. नवनियुक्त सदस्यांना राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दत्तचार्य रामू व राज्याध्यक्ष डॉ. त्रिवेणीकुमार कोरे, राज्य सदस्य वाकलकर व कमलेश सोनवणे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रीय युवा परिषद राष्ट्रीय स्तरावर अराजकीय क्षेत्रात काम करणारी संघटना आहे. संपुर्ण जिल्हामध्ये राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करून राष्ट्रीय युवा परिषदेच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविणार आहेत. तसेच समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करून राष्ट्रीय स्तरावर आपल्या जिल्ह्याची एक चांगली व सक्षम ओळख निर्माण करण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करण्यात आहे.