मुंबई (वृत्तसंस्था) टी २० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी त्यांची कामगिरी चांगलीच झाली. भारतीय संघाचे भवितव्य उज्वल आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संघातील महिला खेळाडूंचे कौतुक केले आहे.
पवार यांनी याबाबतचे एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये शरद पवार म्हणाले की, ” आपल्या भारताच्या महिला संघाला ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. पण भारतीय संघाने दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत स्थान पटकावले होते. महिला संघाने आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली. भारतीय संघाचे भवितव्य उज्वल आहे. भारतीय संघाला यापुढील यशासाठी शुभेच्छा. दरम्यान, विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा ८५ धावांनी पराभव करत टी २० विश्वविजेते पटकावले. सलामीवीर एलिसा हेली (७५) आणि बेथ मूनी (७८*) यांच्या फटकेबाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने ४ बाद १८४ धावांची मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने विजेतेपदाची संधी गमावली.