मुंबई : वृत्तसंस्था । भारतीय नौदलाचं प्रशिक्षक मिग-२९के विमान गुरुवारी अरबी समुद्रात कोसळलं आहे. उड्डाण करत असताना विमान दुर्घटनाग्रस्त झालं. दुर्घटनेची माहिती मिळताच सर्च ऑपरेशन करणाऱ्या . रेस्क्यू टीमने एका वैमानिकाला वाचवलं
दुसऱ्या वैमानिकाचा शोध अद्याप सुरु आहे. चौकशीचे आदेश दिले आहेत. भारतीय नौदलाकडून यासंबंधी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. “भारतीय नौदलाचं मिग-२९के प्रशिक्षक विमान २६ नोव्हेंबरला पाच वाजता दुर्घटनाग्रस्त झालं. एका वैमानिकाचा शोध लागला आहे, तर दुसऱ्या वैमानिकाचा हवाई तसंच समुद्रमार्गे शोध घेतला जात आहे. चौकशीचा आदेश देण्यात आला आहे,” अशी माहिती भारतीय नौदलाने दिली आहे.
मिग-२९ विमानं याआधीही अनेकदा दुर्घटनाग्रस्त झाली आहेत. ८ मे २०२० रोजी पंजाबमधील नवाशहर येथे नौदलाचं लढाऊ विमान मिग-२९ तांत्रिक बिघाड झाल्याने दुर्घटनाग्रस्त झालं होतं. यावेळी वैमानिकाने पॅराशूटच्या सहाय्याने विमानातून उडी मारुन आपला जीव वाचवला होता. विमान एका शेतात दुर्घटनाग्रस्त झालं होतं, शेताला आग लागली होती.
२३ फेब्रुवारी २०२० रोजी गोव्यात मिग-२९ दुर्घटनाग्रस्त झालं होतं. वैमानिक या दुर्घटनेतून सुखरुपपणे बाहेर पडला होता. विमानाने प्रशिक्षणासाठी उड्डाण केलं होतं. मात्र काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड झाला ज्याची माहिती एअर ट्राफिक कंट्रोलला देण्यात आली. दरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त झालं.