जळगाव, प्रतिनिधी | विद्यापीठांच्या कुलपतींचे अधिकार शिक्षण मंत्र्यांना देऊन विद्यापीठात राजकीय हस्तक्षेप होईल असे विधेयक विधानसभेत कुठलीही चर्चा न करता विद्यार्थ्यावर अन्यायकारक असणारे विधेयक पास करण्यात आला असल्याचा आरोप करत भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा व महानगरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे या विधेयकाची होळी करून राज्य शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शाखाली भारतीय जनता युवा मोर्चा जळगाव जिल्हा व महानगर यांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष.श्रीकांत महाजन यांच्या नेतृत्वात प्रदेश सचिव भैरवी वाघ पलांडे,यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी महानगरचे सरचिटणीस मिलिंद चौधरी, जितेंद्र चौथे, महेश पाटील, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, रावेर तालुकाध्यक्ष महेंद्र पाटील, पाचोरा तालुकाध्यक्ष समाधान मुळे, धरणगाव तालुकाध्यक्ष निर्दोष पवार, सुभाष पवार, सागर भारंबे, परेश पाटील, भैया ठाकूर यांच्यासह जिल्ह्यातील युवा मोर्चा चे प्रमुख पदाधिकारी,महानगरचे पदाधिकारी आदी उपस्थितीत होते. विधेयकाची होळी करून हे अन्यायकारक विधेयक रद्द न केल्यास या पुढे युवा मोर्चा जळगाव जिल्ह्याच्या वतीने उग्र आंदोलन या पुढे करण्यात येईल असा इशारा यावेळेस देण्यात आला.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/608781060407292