भारतीय जनता पार्टी मंडल क्र. ६ तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती निमित्त आज भा.ज.पार्टी मंडल क्र.६.तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून मास्क वाटप करण्यात आले.

भारतीय जनता पार्टी मंडल क्र. ६ मधील वाघ नगर व हरीविठ नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी या भागातील १०० नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले. याप्रसंगी मंडल अध्यक्ष अजित राणे, जिल्हा कोषाध्यक्ष प्रा. जिवन अत्तरदे, विधानसभा प्रमुख दिपक साखरे, प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर, नगरसेविका पार्वताबाई भिल, लक्ष्मण धनगर उपस्थित होते.

Protected Content