मुंबई (वृत्तसंस्था) भारतासह जगातील काही देशांवर कोरोना नामक वायरसच्या धोक्याचे सावट आहे. हा धोकादायक वायरस चीनमध्ये आढळला आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संस्थने (WHO) भारत देशासोबतच अन्य देशांना देखील सतर्कतेचा इशारा देत हा वायरस अत्यंत धोकादायक असल्याचे सांगितले आहे.
चीनमध्ये एकूण ५९ लोकांना या धोकादायक वायरसची लागण झाली आहे. आता हा वायरस संपूर्ण जगात पसरत आहे. या वायरसमुळे सामान्य लोकांचा बळी जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. नुकताच चीनच्या प्राधिकरणाने एक अहवाल सादर केला. अहवालात वुहान शहरात एकूण ५९ लोकांना या नवीन विषाणूचा संसर्ग झाल्याचे दिसून आले आहे. चीनसोबतच आता थायलँड, सिंगापूर, मलेशिया या देशांमध्ये देखील या विषाणूचा धोका पसरत आहे.
चीनमधील वुहानामध्ये एका संशोधनात नेपाळी विद्यार्थ्याला या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले होते. हा विद्यार्थी ५ जानेवारी रोजी नेपाळमध्ये आला. त्याच्यावर आता काठमांडू येथील शुक्रराज ट्रॉपिकल रूग्णालयात उपचार सुरू आहेत. चीन सरकारने या बातमीला दुजोरा दिल्यानंतर जागतिक आरोग्य संस्थेने संपूर्ण जगाला सतर्कतेचा इशारा दिला आहे.
jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news