भारताने किमान १० आठवड्यांचा लॉकडाउन पाळला पाहिजे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मला कल्पना आहे की तुम्हाला अर्थव्यवस्थेला चालना द्यायची आहे. पण घाई करु नका. जर तुम्ही लॉकडाउन संपवण्यात घाई केली आणि जर व्हायरसची दुसरी लाट आली तर ती जास्त भयंकर असेल. भारताने किमान १० आठवड्यांचा लॉकडाउन पाळला पाहिजे, असा सल्ला जगातील सर्वात प्रतिष्ठित मेडिकल जर्नल लँसेटचे संपादक रिचर्ड हॉर्टन यांनी भारताला दिला आहे.

 

कोरोनाचा फैलाव रोखण्यात यश न मिळाल्याने भारताने १४ एप्रिल रोजी संपणारा लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवलेला आहे. लॉकडाउनचा हा दुसरा टप्पाही संपण्याच्या जवळ आला आहे. अनेकांना ३ मे नंतर आयुष्य पुन्हा एकदा सर्वसामान्य होईल अशी अपेक्षा आहे. मात्र रिचर्ड हॉर्टन यांनी भारताला लॉकडाउन संपवण्याची घाई करु नका असा सल्ला दिला आहे. भारताने किमान १० आठवड्यांचा लॉकडाउन पाळला पाहिजे असे रिचर्ड हॉर्टन यांनी म्हटले आहे. दरम्यान, भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी दोन टप्प्यात लॉकडाऊन करण्यात आले. सध्या भारतात कोरोना रुग्णांची संख्या २० हजारांच्या वर पोहचली आहे. तर ६०० पेक्षा अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. लॉकडाऊन असलं तरी कोरोना रुग्णाच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक आहे.

Protected Content